शेतकऱ्यांना पैसे द्यायची वेळ आली की कागलचे तिन्ही नेते शेतकऱ्यांविरोधात एकत्र येतात : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी यांचा घणाघात

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुक्यातील तिन्ही नेते, साखर कारखानदार लोकसभा, विधानसभेला एकमेकांविरोधात लढतात; पण शेतकऱ्यांना पैसे द्यायची वेळ आली की तिघे एकत्र येतात, असा घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक व समरजितसिंह घाटगे यांच्यावर नाव न घेता केला.
मुरगुड येथील हुतात्मा तुकाराम चौकातील सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पै. सदाशिव भारमल होते. महावीर मगदूम, मायकेल बारदेस्कर, बाळासाहेब पाटील, नामदेव भराडे आदी प्रमुख उपस्थित होते. एक काळ होता ज्याकाळी स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे व खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी ऊस दराची कोंडी फोडून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली होती ; पण तो काळ आता कागल तालुक्यात राहिला नाही, असे शेट्टी यांनी सांगितले.
यावेळी बाळासाहेब पाटील, मायकेल बारदेस्कर, जोतिराम सूर्यवंशी, महावीर मगदूम, नामदेव भराडे, शिवाजी कमळकर, परशुराम कदम, सचिन खोत, भागवत शेटके, पांडुरंग अडसूळ, तानाजी मगदूम, सागर कोंडेकर, मारुती चौगुले आदींची भाषणे झाली.
अण्णा कदम, दत्ता साळोखे, राणोजी गोधडे, जोतिराम सूर्यवंशी संदीप भारमल, शिवाजी कळमकर, बाजीराव पाटील, सागर कोंडेकर, सखाराम डेळेकर, राजाराम रावण, सर्जेराव भाट, जगदीश गुरव, मयूर सावर्डेकर, विजय गोधडे, आनंदा गोधडे, विजय आडव आदी उपस्थित होते. स्वागत प्रास्ताविक समाधान हेंदळकर यांनी केले. आभार जगदीश पाटील यांनी मानले.
बिद्रीने ३२०० दर जाहीर करून कारखाना बंद ठेवलाय आणि यांनी ३ हजार जाहीर करून कारखाने सुरू केलेत. यांना लाज कशी वाटत नाही, असा सवाल करून शेट्टी यांनी केला.वर्षाला यामुळे शेतकऱ्यांचे ४४ कोटी बुडवायला बसलेत, असा आरोप केला.