मोठी बातमी : दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या होणार जाहीर

दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या निकालाची प्रतिक्षा संपली आहे. विद्यार्थी या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. आता याच पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या म्हणजेच 28 ऑगस्टला दुपारी जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे.
दहावीची परिक्षा 10 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत परीक्षा घेण्यात आली होती. तर बारावीची परीक्षा 18 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आली होती. याचाच निकाल उद्या जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना गुण पडताळणी, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रत आणि पुनर्मूल्यांकन या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतील.
आता दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या निकाल दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. यात विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.