ताज्या बातम्यामहाराष्ट्र
पन्हाळा : काळजवडे पैकी सुंभेवाडी येथील तरुण कळे येथून बेपत्ता

कळे -वार्ताहर अनिल सुतार
पन्हाळा तालुक्यातील काळजवडे पैकी सुंभेवाडी येथील साहिल विलास सुंभे वय २० हा तरुण दि २४ ऑगस्ट रोजी सकाळी साडेपाच वाजता रंजनराज हॉटेल कळे ता.पन्हाळा येथून बेपत्ता झाल्याने व तो आजतागायत घरी न आलेने आई संपदा विलास सुंभे यांनी कळे पोलीस ठाण्यात मिसिंग वर्दी दाखल केली आहे.
मिसिंग साहिल सुंभे हा रंगाने सावळा,उंची ५ फूट २ इंच ,अंगाने- मध्यम,नाक-सरळ ,केस लहान काळे,अंगात दगडी रंगाचा टी शर्ट व काळ्या रंगाचे जर्कींग व काळी लांब पॅन्ट,पायात सॅन्डेल , अंगावर काळ्या पांढऱ्या फोडी,मराठी भाषा बोलणारा असे त्याचे वर्णन असून कुठे आढळल्यास तात्काळ कळे पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.पुढील तपास सहायक फौजदार महादेव खाडे करत आहेत.