दात्यांनी मदतीसाठी पुढे यावे : आयेशा राऊत

कुडूत्री प्रतिनिधी : सुभाष चौगले
कोरोना काळात सर्वसामान्यांची अवस्था बिकट झाली आहे.त्यातच ग्रामीण जीवनांचे वेळापत्रक बदलल्याने खायच काय अशी केवीलवाणी अवस्था झाली आहे. अशा गरजू लोकाना सामाजिक कार्यकर्त्यांनी अडचणीच्या काळात मोलाची साथ दिली पाहिजे असे प्रतिपादन अँस्टर आधारच्या प्रशासकीय अधिकारी आयेशा राऊत यानी केले.
कुडूत्री येथील कल्लेश्वर मंदीरात कोरोना प्रतिबंध समितीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप कार्यक्रम आयोजीत केला होता. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या.अधयक्षस्थानी सरपंच सोनाबाई सुतार होत्या.
यावेळी कोल्हापूर जिल्हा महिला संघटिका आणि समनव्यक पूनम देसाई ५० किट्स, डवरवाडीचे सामा.कार्यकर्ते (११ किट्स) संतोष कावळे राधानगरी (१२ किटस्) बाजीराव पाटील व नामदेव पोवार (११ किट्स) यांनी राधानगरी तालुक्यातील कुडूत्री,करंजफेण, राधानगरी आणि सोन्याची शिरोली इथल्या मजुरांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप केले.
यावेळी सामा.कार्यकर्त्या पुनम देसाई, ग्रा.पं.सदस्य महेश चौगले, यानी मनोगत व्यक्त केले.मंडल अधिकारी सुंदर जाधव,यांच्यासह पत्रकारांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी
सरपंच सोनाबाई सुतार,पो. पाटील भारती पारकर, ग्रामसेविका रेणुका सणगर, शिवाजी चौगले, बलभिम सेवा संस्था व्हा. चेअरमन दत्तात्रय कांबळे, रामचंद्र पाटील, बी.एस.सुतार,संतोष पारकर,येसाजी रानमाळे,अजिंक्य घुगरे, रणजीत मोहिते, राम घुगरे, अविनाश कांबळे करंजफेण,पप्पू जोहार, राजेश घुगरे, अनुराधा कांबळे,पत्रकार संजय कांबळे आदी उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक रामचंद्र चौगले, सूत्रसंचालन रोहित पारकर यांनी तर आभार प्रकाश चौगले यानी मानले.
विशेष सत्कार
हिंदु कुंटूबातील व्यक्तीला मुस्लीम महिलेने मुखाग्नी देऊन समतेची शिकवण देणाऱ्या अँस्टर आधारच्या प्रशासकीय अधिकारी आयेशा राऊत यांचा कोल्हापूरी फेटा,शाल, पुष्पहार, झाड,आणि पुस्तक देऊन पुनम देसाई व सरपंच सोनाबाई सूतार यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.