लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी कष्टकऱ्यांची क्रांती जगभर पोहोचवली : नामदार हसनसाहेब मुश्रीफ ; कागलमध्ये मातंग समाजात जयंती, विकासकामांसह धान्यवाटप

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अवघे दीडच दिवस शाळेत गेले. त्यांच्या समृद्ध साहित्याने कष्टकऱ्यांची क्रांती जगभर पोहोचवली, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी काढले.
कागलमध्ये मातंग समाजात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त आयोजित जयंतीसह विकास कामांचा प्रारंभ व धान्यवाटप कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंत्री श्री. मुश्रीफ यांच्यासह मान्यवरांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
दलितमित्र बळवंतराव माने म्हणाले, नामदार हसन साहेब मुस्लिम सदैव मातंग समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वसा आणि वारसा खऱ्या अर्थाने मंत्री श्री. मुश्रीफसाहेब यांनी कामातून जोपासला आहे.
नगरसेवक सौरभ पाटील म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांच्या विचारानेच जातीव्यवस्थेची उतरंड मोडण्याचे काम नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी केले आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, केडी मसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, गणेश सोनुले, संजय सोनुले, तुषार सोनुले, रोमान्ना सोनुले, सौरभ पाटील, दलितमित्र बळवंतराव माने आदी प्रमुखांची भाषणे झाली.
व्यासपीठावर जेष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, केडीसीसी बँकेची संचालक भैय्या प्रताप उर्फ भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, प्रवीण काळबर, नवाज मुश्रीफ, संजय ठाणेकर, ॲड. संग्राम गुरव, सागर गुरव, युवराज लोहार, महेश गाडेकर, बाळासाहेब भरमकर, संग्राम लाड, आनंदा हेगडे, सचिन नलवडे आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी दलित वस्ती सुधार योजनेमधून मंजूर झालेल्या लहान हायमास्टचा शुभारंभ व समाजातील कुटुंबांना धान्यवाटप झाले.स्वागत प्रकाश सोनुले यांनी केले.