ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मुरगुड : जान्हवी सावर्डेकरला सीनियर नॅशनल पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्यपदक

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड ता.कागल येथील कु. जान्हवी जगदीशकुमार सावर्डेकर हिने काशीपूर (उत्तराखंड) येथे आज झालेल्या सीनियर नॅशनल पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करताना ७६ किलो वजन गटामध्ये स्क्वाड – २२० किलो, बेंचप्रेस- १२५ किलो, डेड लिफ्ट – १८७.५ किलो व टोटल ५३२.५ किलो वजन उचलून रौप्य पदक पटकावले.
जान्हवी ज्युनियर गटातील असूनही तिने सिनीयर गटात भाग घेत स्वतःचे ५३२.५ किलो वजन उचलण्याचा राष्ट्रीय रेकॉर्ड नोंदविला आहे.
तिला मार्गदर्शक प्रा. प्रशांत पाटील, प्रशिक्षक विजय कांबळे व प्राचार्य, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड (Sportnotation and therapy diploma) वडील जगदीशकुमार सावर्डेकर भाऊ मयूर सावर्डेकर यांचे प्रोसाहन लाभले.