ताज्या बातम्या

जनतेचा रोष लक्ष्यात घेऊन लॉकडाऊनचा निर्णय आठ तासांत मागे! आता जनता कर्फ्यू

रोहन भिऊंगडे/

कोल्हापुर :- गोकुळ निवडणुकीनंतर लगेच बुधवारपासुन लॉकडाउनच्या निर्णयावरून समाज माध्यमांवर टीकेचा भडिमार झाल्यानंतर मंगळवारी आठ तासात तच हा निर्णय मागे घेण्यात आला. लॉकडाऊन नाही तर नागरिकांनी 10 दिवसांचा उस्फूर्तपणे जनता कर्फ्यू पाळावा असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.

 कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेली गोकुळची निवडणूक नुकतीच पार पडली असता, मंगळवारी मतमोजणी सुरु झाल्यानंतर सकाळी 10 वाजता जिल्ह्यातील तीनही मंत्री व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त बैठकित बुधवारपासून कडक लॉकडाऊ चा निर्णय घेण्यात आला.

 दुपारी साडेतीन वाजता याबाबतची बातमी देखील माहिती कार्यालयाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर कोल्हापूरकरांनी संताप व्यक्त करत व्हाट्सअप, फेसबूक, ट्विटर,वरून तिचा करायला सुरुवात केली. गोकुळ निवडणुकीवरून सर्वच राजकीय नेत्यांना शेलक्या भाषेत भडीमार करण्यात आला. सायंकाळी सहा वाजता पालकमंत्री सतेज पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यावेळी झालेल्या चर्चेनंतर जनता कर्फ्यू चा निर्णय घेण्यात आला. तीनही मंत्र्यांच्या वतीने याबाबतचे पत्रक प्रसिद्ध करून 10 दिवसाचा उस्फूर्तपणे जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन करण्यात आले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks