ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मुरगुड – निपाणी महामार्गावर दुचाकी व टेम्पोच्या धडकेत एकजण जागीच ठार

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड मार्गावर देवचंद महाविद्यालयनजीक दुचाकी व टेम्पो यांच्या झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला. तर एक किरकोळ जखमी झाला. ही घटना शनिवारी रात्री ८.१५ सुमारास घडली. कागल तालुक्यातील बोळावी येथील शंकर ईश्वरा पसारे (वय ५७, ) असे ठार झालेल्याचे नाव आहे. ते वन विभागात कार्यरत होते.
याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी, दूध वाहतूक करणारा टेम्पो लिंगनूरहून निपाणीच्या दिशेने येत होता. दरम्यान, निपाणीहून बोळावीच्या दिशेने जाणारी दुचाकी रवी पवार व शंकर पसारे हे दोघेजण जात होते. टेम्पोची दुचाकीला जोरात धडक बसून पाठीमागे बसलेले शंकर पसारे जोरात कोसळल्याने ते जागीच गतप्राण झाले.