कागल तालुक्यातील उंदरवाडीत चक्क पालखीतून काढली आईची अंतयात्रा

भल्यामोठ्या पगारांच्या नोकऱ्या असताना जन्मदात्या आई बाबांना वृध्दाश्रमात ठेवणारी मुले आहेत .तर बऱ्याच आई- वडिलांची उतारवयात हेळसांड होत आहे .मात्र कागल तालुक्यातील उंदरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ता असलेल्या मुलांने आई वारल्यानंतर तिची पालखीतून अंतयात्रा काढायची म्हणून एक वर्षे आधीच पालखी करुन गुरुवारी निधन झाल्यावर आईची पालखीतून अंतयात्रा काढून आईबद्दल असलेले प्रेम व्यक्त केले याची चर्चा सर्वत्र होत आहे.
उंदरवाडी येथील श्रीमती भागिरथी शिवाजी पाटील यांचे वयाच्या ८२ व्यावर्षी निधन झाले. आईने केलेल्या अपार कष्ट घडवलेल्या संस्कारामुळेच आम्ही घडलो आहोत आई बद्दलचे प्रेम वेगळं असून तिच्या निधनानंतर टाळ मृदुंगाच्या गजरात आणि पालखीतून आईची अंत्ययात्रा मारुती पाटील यांनी काढली गावच्या यात्रेत सामील झालं होतं.आईने आमची परिस्थिती नसताना मोलमजुरी करुन आमचा सांभाळ केला .खूपच कष्ट सोसले त्यामुळे मी कमवता झालो तसा तिला काही कमी पडू दिले नाही तिला विचारुन तिच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण केल्या .
तर काही दिवसापूर्वीच सर्व नातेवाईक यांना बोलावून आईचे पाद्यपूजन कार्यक्रम करुन सर्वासोबत जेवली तिचा आशिर्वाद म्हणूनच आज मला आणि माझ्या मुलांना काही कमी नाही. म्हणून निधनानंतर सुद्धा पालखीतून अंतयात्रा काढणार असे ठरवले . आईचे निधन झाल्यावर तिची अंतयात्रा काढली असे मुलगा मारुती पाटील यांनी सांगितले.