श्री. शिवाजी हायस्कूलमध्ये रंगला विज्ञान दिनाचा सोहळा

राधानगरी प्रतिनिधी : प्रतिश पाटील
श्री शिवाजी हायस्कूल व ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स क॥ तारळे ता. राधानगरीया शाळेमध्ये आज ‘ विज्ञान दिवस ‘ साजरा करण्यात आला. आजच्या या विज्ञान दिवसाच्या निमित्ताने प्रथम ज्यांच्या सन्मानार्थ हा राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो ते भौतिकशास्त्रज्ञ भारतरत्न डॉ.सी.व्ही. रामण यांच्या प्रतिमेचे पुजन प्रशालेचे जेष्ठ शिक्षक श्री.बी.पी. शितोळे सर यांच्या हस्ते करण्यात आले. भौतिकशास्त्रज्ञ भारतरत्न डॉ.सी.व्ही. रामण यांना रामण परिणामाचा शोध लावल्याने त्यांना जगप्रसिद्ध नोबेले पारितोषिक हा सन्मान 2८ फेब्रुवारी १९२८ या दिवशी मिळाला म्हणून त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. त्यानंतर शाळेतील सर्व विदयार्थी विद्यार्थिनींना विज्ञान दिनाचे महत्व विज्ञान शिक्षक श्री. गुरव सर यांनी सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयक आपली मनोगते, कविता, बडबडगीते तसेच शास्त्रज्ञांच्या संबंधित रंजक कथा सांगितल्या. शाळेमध्ये विज्ञान प्रयोग , विज्ञान रांगोळी , विज्ञान चित्रकला, विज्ञान फलक लेखन या स्पर्धांचे आयोजन केले होते. या विविध स्पर्धेमध्ये जवळपास शंभर विदयार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या सर्व स्पर्धेसाठी संस्थेचे चेअरमन श्री. हिंदूरावजी खामकर, जॉ.सेक्रेटरी श्री. जयसिंग खामकर, मुख्याध्यापक श्री .एस.बी.पाटील सर , माध्य. विद्यालय मोहडे चाफोडीचे मुख्याध्यापक श्री. सुभाष खामकर सर, यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विज्ञान शिक्षिका सौ. शिवुडकर मॅडम, श्री.सिद सर, श्री. पी. के. पाटील सर, श्री.एस.एम. ऱ्हायकर, श्री. व्ही.बी. कांबळे, भोगटे मॅडम, प्रयोगशाळा सहाय्यक संभाजी मोहिते यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यामुळे विज्ञान दिनाचा हा सोहळा विस्मरणीय असा पार पडला.