कोल्हापूर : सर्व श्रम संहिता रद्द करून कामगार कायदे कायम करण्यासाठी संभाजी ब्रिगेड तर्फे निवेदन

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सरकारच्या धोरणामुळे कामगारांनी लढून मिळविलेले हक्क टिकवणेसाठी क्रांती दिनी हे निवेदन द्यावे लागत आहे. हे अत्यंत खेदजनक आहे. देशाचे स्वातंत्र्य मिळविण्यात कामगार संघटनानी मोठे योगदान दिले आहे अशा स्थितीत स्वातंत्र्याला ७५ वर्षे पुर्ण होत असताना आपले हक्क कमी होवू नयेत यासाठी कामगारांना लढावे लागत आहे. हे आपल्या सरकारला शोभादायक नाही. गेल्या ७५ वर्षांत देशाचा विकास कामगारांनी राबून केला आहे. परंतु कार्पोरेट हितासाठी आज कामगारांना विकासाचे फळ मुक्तहस्ते देण्याऐवजी त्यांचे हक्क काढून घेतले जात आहेत. आपल्या देशात विकासाची गंगा उलट दिशेने वाहत आहे हे यावरुन दिसून येत आहे
संकोचित प्रश्नांचा बावू करुन देशातील श्रम करणा-यांच्या प्रश्नावरुन लक्ष उढावे व युवक चुकीच्या भावनिक प्रश्नात आडकावे असे धोरण आपल्या सत्तेकडून राबविले जात आहे अशी टीका संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष निलेश सुतार यांनी केली.
मणिपुर येथे या धोरणाचे गंभीर परिणाम स्पष्ट दिसत आहेत. आपल्या या धोरणामुळे समाजाचे धागेदोरे नष्ट होत असून, देशाच्या अखंडतेला याचा धोका निर्माण झाला आहे याची नोंद देत आहोत.
संभाजी ब्रिगेड कामगार आघाडी वतीने अप्पर चिटणीस स्वप्नील पोवार यांच्या कडे प्रमुख मागण्या समोर ठेवल्या .
१. सर्व श्रम संहिता रदद करून कामगार कायदे कायम करा.
२. राज्य पातळीवर या श्रमसंहितांचे नियम केले ते रदद करा.
३. सर्वांना दरमहा किमान २६,०००/- रुपये “किमान वेतन” द्या.
४. सर्व कामगारांना किमान १०,०००/- पेन्शन लागू करा.
५. सरकारी यंत्रणेतील कामे कंत्राटी पध्दतीने देण्याचे धोरण रदद करा.
६. हंगामी, कंत्राटी, तात्पुरत्या, रोजंदारी, मानधनी कामगारांना कायम करा.
७. असंघटीत कामगारांना हक्क मिळावे यासाठी कामगार कल्याण मंडळ स्थापन करा.
८. राष्ट्रीय संपती व सार्वजनिक सरकारी उद्योगांची विक्री व लुट थांबवा.
आमच्या या मागण्या आपण देश हिताच्या व कामगार हिताच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. तरी वरील सर्व मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला . यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष निलेश सुतार, सतीश सर्वगोडे, भगवान कोइंगडे,अमोल माने,सचिन गुरव, दिगंबर स्वामी,सर्जेराव कालुगडे, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.