पन्हाळा गडावर तोफगाडा बसविण्यासाठी आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांची मदत ; कोल्हापुरातील शिवकार्यनिष्ठा प्रतिष्ठाणचा गडकोट संवर्धन उपक्रम

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
ऐतिहासिक किल्ले पन्हाळगडावर तोफगाडा बसविण्यासाठी आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी आर्थिक मदत केली. कोल्हापुरातील शिवकार्यनिष्ठा प्रतिष्ठानने गडकोट संवर्धनाचा हा उपक्रम हाती घेतला आहे. श्री. मुश्रीफ यांच्या या मदतीबद्दल प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
मराठ्यांच्या जाज्वल्य आणि देदीप्यमान इतिहासात सुवर्ण अक्षरांची नोंद असलेला एक मानाचा मानकरी तसेच हिंदवी स्वराज्य संस्थापक , रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे किल्ले पन्हाळा. या स्वराज्य निर्मितीसाठी नरवीर शिवा काशिद , रणझुंजार बाजीप्रभू , बांदल सेना यांच्या बरोबर असंख्य मावळे यांनी बलिदान दिले. त्यांच्या शौर्य महिन्याचे औचित्य साधून तोफगाड्याची प्रतिष्ठापना होणार आहे.
यावेळी शिवकार्यनिष्ठा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी खोत, उपाध्यक्ष विद्याधर घोटणे, नंदकिशोर वांईंगडे, सौरभ पाटील, सतीश सुतार, प्रथमेश सासणे, पवन चौगुले आदी मावळे उपस्थित होते.