ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कै गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील माध्यमिक विद्यालय म्हाळेवाडी शालेय आंतरवासिता कार्यक्रमाला सुरुवात

चंदगड प्रतिनिधी/पुंडलिक सुतार

कै गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील माध्यमिक विद्यालय म्हाळेवाडी येथे आंतरवासिता कार्यक्रमाला सुरुवात झाली. महादेवराव बी. एड कॉलेज तुर्केवाडी अंतर्गत दहा दिवस हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन मुख्याध्यापक एन.आर.भाटे, पी. एल.सुतार, एन.एस.दळवी, एम. के.पाटील, महादेवराव बी.एड कॉलेज तुर्केवाडी कॉलेजचे प्राचार्य एन.जे.कांबळे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पी. एल. सुतार होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधुरी कांबळे यांनी केले. यावेळी प्राचार्य एन.जे.कांबळे म्हणाले, आंतरवासिता कार्यक्रम हा बी.एड प्रशिक्षणार्थीना अनुभव येण्यासाठी हा महत्वाचा टप्पा आहे. वर्गातील अध्यापन व बाहेर जाऊन विद्यार्थ्यांना शिकवण्याचा अनुभव हा आंतरवासिता कार्यक्रम आहे. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी, विद्यार्थ्यांना नवनवीन ज्ञान आत्मसात करणं गरजेचे आहे. आता तंत्रज्ञानाच युग आलं आहे. तसेच भविष्यात डिजिटल तंत्रज्ञान निर्माण होणार आहे .

कदाचित भविष्यात विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी रोबोट येऊ शकतात व त्याचा सहाय्याने शिक्षणात प्रगती होऊ शकते.मोबाईलचा वापर चांगल्या गोष्टी साठी करा चुकीच्या गोष्टीसाठी करू नका. त्यामुळे आपल्या मानसिकतेवर परिणाम होताना दिसत आहे. आकलन क्षमतेवर परिणाम होताना दिसून येत आहे. विद्यार्थ्यांनी वेळेनुसार बदलत राहील पाहिजे.

यावेळी एन एस दळवी, प्रा ग.गॊ. प्रधान यांचे मार्गदर्शन लाभले. ऐश्वर्या पांडव, अश्विनी नरी, मनीषा कांबळे, मल्लूताई नाईक, कीर्ती मोरे, पूनम पाटील, शकुंतला देशनुरे व विद्यार्थी स्टाफ कर्मचारी वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रसिका तोडकर यांनी केले. सोनाली वानोळे यांनी आभार मानले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks