ताज्या बातम्यामहाराष्ट्र

नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनचे शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

प्रतिनिधी : विजय मोरबाळे

नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशन, कागल व कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेल यांच्यावतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. कागल मतदार संघातील प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुरस्कारासाठी आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष व गोकुळचे संचालक नविद मुश्रीफ यांनी केले.

आपले विहित नमुन्यातील अर्ज नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या शाखा कागल (7038431024 ), मुरगूड (7709159898 ), उत्तुर ( 9270113932 ) व गडहिंग्लज (9764431858 ) येथे दिनांक 19 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करावेत, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी कोजिमाशिचे संचालक राजेंद्र पाटील, शिक्षक सेलचे अध्यक्ष शंकर संकपाळ, माजी उपनगराध्यक्ष सुनील माळी, नंदकुमार घोरपडे, सुकुमार पाटील, अरविंद पाटील, के. व्ही. पाटील, नंदकुमार कांबळे, शानाजी माने, काका पाटील, टी. एस. सामंत, सुभाष भोसले, संजय कदम, तानाजी पाटील, विनायक तोरसे, जी. एस. पाटील आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks