ताज्या बातम्यामहाराष्ट्र
युवराज येडूरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राधानगरी विधानसभा संघटकपदी निवड

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, कोल्हापूर जिल्हा मनसे संपर्क अध्यक्ष जयराज दादा लांडगे यांच्या सूचनेनुसार युवराज येडूरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राधानगरी विधानसभा संघटकपदी निवड करण्यात आली आहे. कोल्हापुर येथे जिल्हाअध्यक्ष त्यांच्या हस्ते निवड पत्र देण्यात आले.
कोल्हापुर येथे झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे कामगार बांधणी कार्यक्रमात युवराज येडूरे या नावाची घोषणा कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी केली. त्यांच्या हस्ते निवड पत्र व त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले,मनसे कामगार सेनेचे चिटणीस, मनसे उपाध्यक्ष रोहन निर्मळ,आदी उपस्थित होते.