ताज्या बातम्यामहाराष्ट्र

बहूजनांच्या सोयीसाठी बोअरवेल मारुन स्व राजे विक्रमसिंह घाटगे यांना कृतीतून अभिवादन : समरजितसिंह घाटगे

प्रतिनिधी : विजय मोरबाळे

स्व. राजेंच्या अमृत महोत्सवी जयंती निमित्त त्यांनीच वसवलेल्या शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी बहुजन समाजातील श्री बाळासो नाईक यांनी स्वखर्चातून बोरवेल मारले.स्व.राजेसाहेब
यांच्या आशीर्वादाने त्याला चांगले पाणीही लागले. स्व.राजेंना अपेक्षित शाश्वत विकासाच्या या कार्यातून त्यांनी कृतीतून अभिवादन केले आहे. असे प्रतिपादन राजे समरर्जीतसिंह घाटगे यांनी केले.

राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या अमृतमहोत्सवी जयंतीनिमित्त शाहूनगर व नवीन घरकूल परिसरात बाळासो नाईक यांनी स्वखर्चातून मारलेल्या बोअरवेलच्या पाणी पूजन सोहळ्यावेळी ते बोलत होते.

श्री.घाटगे पूढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखालील केंद्र सरकार,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व अजितदादा यांचे नेतृत्वाखालील राज्य सरकार लोकहिताचे निर्णय घेत आहे.प्रशासनाच्या माध्यमातून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करताना गट तट न पाहता मध्यस्थाशिवाय थेट लाभार्थ्यांना विविध लोककल्याणकारी योजनांचे लाभ मिळत आहेत. मा.मोदी साहेब व फडणवीससाहेब यांचा हा स्वच्छ पारदर्शी व विकासाचा अजेंडा घराघरात पोहोचवण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे

व्यासपिठावर माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी,आनंदा पसारे,बाजार समितीचे माजी सभापती बाबगोंडा पाटील,शाहूचे संचालक यशवंत माने,सतीश पाटील,रमीज मुजावर,बाळासो नाईक,राजे बँकेचे उपाध्यक्ष नंदकुमार माळकर,संचालक आप्पासो हूच्चे,युवराज पसारे आदी उपस्थित होते.

यावेळी संदीप शिंदे दिलीप चव्हाण,उत्तम पाचगावे,संजय कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले.स्वागत मनोज गाडेकर यांनी केले.समीर पाटील यांनी आभार मानले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks