ताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपच्या पदाधिका-यांनी केला नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांचा सत्कार ; कागल विश्रामगृहावर घेतली सदीच्छा भेट

प्रतिनिधी : विजय मोरबाळे

भारतीय जनता पार्टीच्या कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांचा सत्कार केला. कागल येथील विश्रामगृहावर नामदार श्री. मुश्रीफ यांची या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली

महाराष्ट्र राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल कागल, गडहिंग्लज व उत्तूर मतदार संघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कागल विश्रामगृह येथे नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी नामदार श्री. मुश्रीफ यांनी सुमारे तासभर मतदारसंघातील व राज्यातील विविध विषयांवर चर्चा केली.

यावेळी चिटणीस श्री. तानाजी बाबुराव कुरणे- कासारी, सरचिटणीस एकनाथ पाटील- मौजे सांगाव, मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष श्री. संजय दुलबा कांबळे- हसुर खुर्द, जिल्हा चिटणीस श्री. राजेंद्र सरनाईक- करड्याळ, कागल शहराध्यक्ष श्री. अरुण सोनुले, श्री. सचिन पाटील -बानगे, श्री. राऊ कांबळे- माद्याळ, श्री. सागर माने, ॲड. अमर पाटील- बेलवळे बुद्रुक, डाॅ. श्री. सी. के. चौगुले-गोरंबे, श्री. शंकर शेटके- हसुर खुर्द आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks