सहकारी संस्थांमुळे शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास घडला : जिल्हा परिषदेचे सदस्य सुभाष सातपुते यांचे प्रतिपादन, कोटेश्वर सहकारी विकास सेवा संस्थेतर्फ लाभांश वाटप

सावरवाडी प्रतिनिधी :
गेल्या पाच दशकात सहकारी संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलला .समाजातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगिण विकासासाठी सहकार चळवळीने व्यापक विकास घडला असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे कॉग्रेस सदस्य सुभाष सातपूते यांनी केले.
करवीर तालुक्यातील बहिरेश्वर येथील कोटेश्वर सहकारी विकास सेवा संस्थेतर्फ आयोजित सभासदांना ७ % लाभांश वाटप कार्यक्रमात सातपूते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ वरुटे होते . यावेळी संस्थेमार्फत सुमारे सहा लाख रुपयांचा लाभांश सभासदांना वितरण करण्यात आला.
यावेळी बोलतांना ज्ञान विज्ञान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुर्यकांत दिंडे म्हणाले कोटेश्वर सहकारी संस्थेने तब्बल पाच दशकात शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे . संस्थेचे कार्य जनताभिमुख आहे.
प्रारंभ संस्थेच्या सभासदांना विविध मान्यवरांच्या हस्ते लाभांश वाटप करण्यात लाभांश वाटप करण्यात आले .यावेळी कुंभीचे माजी उपाध्यक्ष शामराव गोदडे , सरपंच युवराज दिंडे , संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ वरुटे, सिताराम पाटील ,शिवाजी चव्हाण, रंगराव कामत , संजय गोदडे, ज्ञानदेव बचाटे बाळासाहेब बचाटे, कृष्णात वरुटे , अर्चना वरुटे, आदिची भाषणे झाली . प्रास्ताविक संस्था सचिव महेश माने यांनी प्रास्ताविक व स्वागत केले . शेवटी आकाराम दिंडे यांनी आभार मानले.