पन्हाळा : वादावादीचे कारण विचारण्यावरुन गोगवे येथे तिघांना मारहाण. अकरा जनांविरोधात गुन्हा दाखल

कळे-वार्ताहर अनिल सुतार
पन्हाळा तालुक्यातील गोगवे येथे पुतण्याच्या दारात येऊन वादावादी का करत आहात असे विचारल्या मुळे तिघांना मारहाण करण्यात आली. यासाठी अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद उदयसिंग चंद्रकांत पाटील वय 34 रा.गोगवे यांनी कळे पोलीस ठाण्यात दिली आहे.
पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी उदयसिंग पाटील हे सकाळी साडे नऊच्या दरम्यान शेतातून वैरण घेऊन आले असता त्यांना पुतण्या पृथ्वीराज पाटील यांच्या दारात विनोद बापू पाटील, रंगराव सखाराम पाटील हे हातात काठ्या घेऊन वाद घालत असल्याचे दिसून आले. त्यानुसार त्यांना विचारणा केली असता विवेक कृष्णा पाटील, मधुकर तुकाराम पाटील, दशरथ महादेव पाटील, अविनाश मारुती पाटील यांनी काठीने फिर्यादीस उजव्या हातावर ,डोक्यात मारहाण करत जखमी करण्यात आले.तसेच त्यांचे चुलत भाऊ विक्रम बबन पाटील व पृथ्वीराज संभाजी पाटील हे सोडवण्यासाठी आले असता इतर काही जणांनी सहभाग घेत त्यांनाही शिवीगाळ व लाथा बुक्क्यांनी मारहाण करत फिर्यादीची मोटरसायकल एम.एच-09 डी.सी 2642 या गाडीचे आरोपींकडून दगड ,विटा मारुन नुकसान करण्यात आले होते.जखमींना सी.पी.आर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यानुसार संशयित आरोपी विनोद बापू पाटील, रंगराव सखाराम पाटील, दशरथ महादेव पाटील, विवेक कृष्णात पाटील, मधुकर तुकाराम पाटील ,अविनाश मारुती पाटील, आकाराम बंडू पाटील, राऊ भाऊ पाटील, मारुती लक्ष्मण पाटील ,सर्जेराव कृष्णात पाटील, संस्कार प्रदीप पडवळ सर्व रा.गोगवे अशा अकरा जनांविरोधात कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ शंकर पाटील करत आहेत.