ताज्या बातम्यामहाराष्ट्र

शाळा – महाविद्यालय व बसस्थानक येथे निर्भया पथकाची गस्त वाढवावी ; युवासेनेच्या वतीने मुरगुड पोलिसांना निवेदन

प्रतिनिधी : विजय मोरबाळे

शाळा – महाविद्यालय व बसस्थानक येथे निर्भया पथकाची गस्त वाढवावी, अशी मागणी कागल तालुका युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन तालुका व जिल्हा युवा सेनेच्या शिष्टमंडळाने मुरगूडचे पोलिस निरीक्षक गजानन सरगर यांना दिले.

निवेदनात म्हटले आहे की, शिक्षणासाठी आसपासच्या अनेक खेडेगावांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. येण्या-जाण्यासाठी एसटी बस व वडाप यांचा वापर करत असल्यामुळे एसटी बस स्थानक तसेच बाजारपेठ अशा ठिकाणी नेहमी गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेऊन टवाळखोर ग्रुप, रोड रोमिओ यांच्याकडून मुलींची व महिलांची छेडछाड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातून एखादी मोठी घटनाही घडू शकते. त्यामुळे निर्भया पथकाची गस्त वाढवावी. तसेच शाळा महाविद्यालय आवारात व बसस्थानक परिसरात पोलिस कर्मचारी नेमावेत.

यावेळी जयसिंग टिकले, समीर देसाई, राजकिरण सावडकर,विजय भोई, अवधूत पाटील, सागर मगदूम, रितेश कांबळे यांच्यासह युवासैनिक उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks