सेवानिवृत्तीनंतरही शिक्षकांचे शाळा आणि विद्यार्थ्यांशी अतूट नाते असले पाहिजे – मुख्याध्यापक ए. आर.वारके

बिद्री प्रतिनीधी / अक्षय घोडके :
शाळा आणि शिक्षकांचे नाते अतूट असते. शिक्षण क्षेत्राची सेवा केल्यानंतर वयोमानानुसार शिक्षकाला सेवानिवृत्त व्हावे लागते. आपल्या अनुभवाचा फायदा शाळा व विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरला पाहिजे. सेवानिवृत्त झाल्यानंतरही शिक्षकांचे शाळेशी आणि विद्यार्थ्यांशी नाते अतूट असले पाहिजे असे प्रतिपादन बोरवडे विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. आर.वारके यांनी केले.
बोरवडे विद्यालय बोरवडे (ता. कागल ) या शाळेचे शिक्षक दिलीप चौगले यांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभ कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक एकनाथ घोरपडे होते. यावेळी दिलीप चौगले यांचा सपत्नीक सत्कार अशोक वारके व मनीषा साठे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी ई.डी. घोरपडे, एस. डी.बचाटे, पी.डी. वारके, आर.पी. वारके, के. डी. रेडेकर, कृष्णात साठे, श्रीधर कांबळे, विलास कांबळे, एम. एम. साठे, राधिका शिंदे, रेश्मा देवर्डेकर, कीर्ती साळुंखे, के. बी. चौगले, शहाजी पाटील उपस्थित होते.
आर. पी. वारके यांनी प्रास्ताविक केले. एस.डी.बचाटे यांनी आभार मानले.
बोरवडे विद्यालय बोरवडे (ता. कागल )
शाळेचे शिक्षक दिलीप चौगले यांचा सेवा निवृत्ती निमित्त सपत्नीक सत्कार करताना अशोक वारके. शेजारी ई. डी. घोरपडे, एस.डी. बचाटे व इतर