ताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप ? जयंत पाटील यांनी घेतली अमित शाह यांची भेट ? शरद पवार यांना मोठा धक्का ??

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे जयंत पाटील हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाल्यास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासाठी हा दुसरा सर्वात मोठा धक्का असणार असल्याचं सांगितलं जात आहे.

अजित पवार यांच्यानंतर जयंत पाटील यांनी बंड केल्यास शरद पवार यांच्यासाठी तो सर्वात मोठा धक्का असेल. जयंत पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. ज्यावेळी शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, तेव्हा पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून जयंत पाटील यांनी सर्वाधिक आग्रह धरला होता. पवारांनी राजीनामा दिल्याने व्यथित झालेल्या पाटील यांना अश्रूही आवरता आले नव्हते. तर शरद पवार यांनी आमच्या सर्वांचे राजीनामे घ्यावेत, त्यांना पाहिजे ते करावे, पण राजीनामा मागे घ्यावा, असं आग्रही त्यांनी धरला होता. असं असताना जयंत पाटील यांनी साथ सोडल्यास शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का असणार आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks