ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोल्हापूर : लाॅकडाऊन संपताच पुन्हा बाजारपेठेत गर्दी!सोशल डिस्टसिंगचा उडाला फज्जा

कोल्हापुर : रोहन भिऊंगडे
वाढत्या कोरोना संकटामुळे सरकारने विकेंड लाॅकडाऊन जाहिर केला होता. शनिवार-रविवार दोन दिवस लाॅकडाऊनचे पूर्णतः पालन करत जनतेने कोरोना चेन ब्रेक करण्यास मदत केली होती. परंतु आज लाॅकडाऊन संपताच पुन्हा कोल्हापुरात, महाद्वार रोड, राजारामपुरी,शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, गंगावेश, अशा मुख्य बाजारपेठेत गर्दी पहायला मिळाली. यावेळी सोशल डिस्टसिंगचा पुरता फज्जा उडालेला दिसून आला. मंगळवारी येणारा गुढी पाडव्याचा सण आणि आगामी काळात पुन्हा लाॅकडाऊन होण्याच्या शक्यतेने धास्तावलेल्या जनतेने खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली आणि सोशल डिस्टसिंगचा पुर्ण फज्जा उडलेला दिसून आला.