ताज्या बातम्यामहाराष्ट्र
भारताच्या तांदूळ निर्यात बंदीमुळे जागतिक तांदूळ बाजारावर परिणाम !

देशांतर्गत अन्न धान्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी, जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार भारताने 20 जुलै रोजी बिगर बासमती पांढर्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली.
भारताच्या तांदूळ निर्यात बंदीमुळे जागतिक तांदूळ बाजारावर परिणाम होऊन करोडो लोकांना फटका बसण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली.
यामध्ये सर्वाधिक आशियाई आणि आफ्रिकन लोकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. जागतिक तांदूळ व्यापारात भारताचा 40% पेक्षा जास्त वाटा आहे.
भारताने बिगर बासमती तांदळावर निर्यातबंदी लादण्याची ही पहिलीच वेळ नाही, पण यावेळेस त्याचा परिणाम पूर्वीपेक्षा अधिक दूरगामी असण्याची शक्यता आहे.