संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सुधारणा स्वागतार्ह निर्णय : राजे समरजीतसिंह घाटगे

कागल प्रतिनिधी: विजय मोरबाळे
संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांच्या मुलांची 25 वर्षे वयाची अट रद्द केल्याची तरतूद 5 जुलै च्या शासन निर्णय यामध्ये केली आहे त्यामुळे या योजनेतील लाभार्थ्यांना आता त्यांना मोठा दिलासा मिळाला असून शासनाचा हा स्वागतार्ह निर्णय असल्याचे भाजपाचे नेते व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हंटले आहे.
प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हंटले आहे,ज्या महिला विधवा आहेत पण त्यांच्या मुलाचे वय 25 वर्षाच्या वर आहे.आशा महिलांना पेन्शनचा लाभ मिळत नसे मात्र नवीन शासन निर्णयामुळे सर्व विधवा महिलांना आता पेन्शनचा लाभ मिळणार आहे.
या योजनेतील पात्र लाभार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायाची व या योजनेतील अनेक जाचक अटी शासनाच्या निदर्शनास आपण वारंवार आणून दिल्या होत्या. आमच्या याबाबतच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मन:पूर्वक आभार मानत असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात 1000 वरून 1500 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्याची अंमलबजावणी 2023/24 च्या अर्थसंकल्पापासुन जुलै महिन्यापासून सुरू झाली आहे.
मागील सरकारने आपल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात कित्येक प्रश्न सोडवायची फक्त आश्वासनेच दिली.पण महायुती सरकारने मात्र सत्तेत आल्यावर अवघ्या वर्षभरातच अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले आहेत.शासनाच्या निराधार योजनेतील हा सुधारीत अध्यादेशाने कोणीही पात्र लाभार्थी आता वंचित राहणार नाही.