ताज्या बातम्यामहाराष्ट्र
पन्हाळा : वारणानगर ९ कोटी चोरी प्रकरणातील संशयित सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा वासुद – सांगोला येथे खून

वारणा नगर (ता. पन्हाळा) येथील ९ कोटी रुपयांच्या चोरी प्रकरणातील संशयित आणि सांगली येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज चंदनशिवे याचा सांगोला तालुक्यातील वासुद येथे खून झाला. ही घटना आज (दि.३) पहाटे उघडकीस आली आहे.
निलंबित पोलीस अधिकाऱ्याच्या खूनामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. वारणानगर येथील ९ कोटीच्या चोरी प्रकरणात चंदनशिवे याला अटक झाली होती. त्यानंतर त्यास सेवेतून निलंबित करण्यात आले होते, अद्याप खुनाचे कारण समजू शकले नाही.