महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त वाघापूर येथे अनाथ दत्तक मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या 17 व्या वर्धापन दिनानिमित्त वाघापूर येथील आठ महिन्यापूर्वी कै.अरुण पोवार हे अपघातामध्ये मयत झाल्याने त्यांची दोन मुले पोरकी झाली होती.त्या मुलांच्या घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना आधार व पुढील शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला होता पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राधानगरी विधानसभाच्या वतीने ही मुले दत्तक घेतले होती.
त्यांचे दहावीपर्यंतच्या शिक्षणाचा सर्व खर्च हा मनसेचे नेते युवराज येडूरे यांनी उचलला आहे. या माध्यमातून आज २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरिता कु.प्रेम अरुण पोवार आणि कू.गौरी अरुण पोवार या अनाथ मुलांना वर्ष भर पुरेल इतके शैक्षणिक साहित्य देण्यात आले.या दोन्ही मुलांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना शैक्षणिक साहित्य देऊन मनसे पक्षाने कर्तव्य पार पाडले.
या कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक शहाजी पाटील ,सर्व शिक्षक स्टाफ,आणि पत्रकार अनिल कमिरकर,पिंटू भोई,संदीप पाटील,संजय फराकटे,अमर बरकाले,धनाजी कुंभार, अमित कोरे, ऋषभ आमते, सौरभ कांबळे उपस्थित होते.स्वागत राजेन्द्र एकल यांनी केले व आभार महेश लाड यांनी मांडले.