मुरगुड : कंगणावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा ; कागल तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस विद्यार्थी सेनेची मागणी

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले ते भीक स्वरूपात मिळालेलं स्वातंत्र्य आहे. असे वक्तव्य करणाऱ्या कंगणा राणावत हिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तिचा पद्मश्री पुरस्कार काढून घेण्यात यावा अशा मागणीचे निवेदन कागल तालुका राष्ट्रवादी कॅांग्रेस विद्यार्थी सेनेच्या वतीने मुरगूड पोलिसांना दिले आहे .
भारताला १९४७ साली जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक स्वरूपात मिळालेलं स्वातंत्र्य आहे. खरे स्वातंत्र्य २०१४ ला मिळाले .असे देशद्रोही वक्तव्य अभिनेत्री कंगणा राणावतने केले.या वक्तव्यामुळे ज्या हजारो हुतात्म्यानी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले.त्या महापुरूषांचा अवमान झाला आहे . या वक्तव्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा . अशा मागणीचे निवेदन मुरगूड पोलीस स्टेशनचे सपोनि विकास बडवे यांना कागल तालुका राष्ट्रवादी कॅांग्रेस विद्यार्थी सेनेच्या वतीने देण्यात आले.यावेळी कागल तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे उपाध्यक्ष प्रथमेश कोळी यांच्यासह विद्यार्थी कॉग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.