मुरगुड : प्रविणसिंह पाटील यांच्यावतीने सरपिराजी घाटगे तलावाच्या पाण्याचे पूजन

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुरगुड शहर व प्रवीणसिंह पाटील प्रेमी कार्यकर्त्यांच्या वतीने सर पिराजीराव तलावातील पाण्याचे पूजन माजी नगराध्यक्ष, बिद्री सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक प्रवीणसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
मुरगुड, यमगे, शिंदेवाडी या तीन गावांना पाण्याचा पुरवठा करणारा हा तलाव तुडुंब भरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. यामुळे तीन गावातील नागरिकांमध्ये समाधान दिसत आहे.
पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुरगुड शहर व प्रवीणसिंह पाटील प्रेमी कार्यकर्ते यांच्यावतीने तलावातील पाण्याचे पूजन माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सुधीर सावर्डेकर, नामदेव भांदीगरे ,अमर देवळे, संपत कोळी ,विश्वास चौगुले ,किसन कोगनूळे ,रणजीत मगदूम, दिग्विजय चव्हाण ,विजय मेंडके आदी मान्यवर उपस्थित होते. तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने यावेळी साखर पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.