ताज्या बातम्यामहाराष्ट्र
राऊतवाडी धबधबा पर्यटकांना खुला

कोल्हापूर जिल्ह्यात प्रसिद्ध असलेला राऊतवाडी धबधबा आज दिनांक 30 जुलै 2023 पासुन पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे. गेले काही दिवस कोल्हापूर जिल्ह्यातील सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धबधब्यांनी रौद्र रुप घेतले होते.
त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्ह्यातील सर्व धबधबे बंद ठेवण्यात आले होते.दरम्यान, राऊतवाडी येथील स्थानिक प्रशासनाने आजपासून धबधबा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.