ताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजर्षी शाहू स्मारक भवन येथे पार पडलेल्या आय शॉर्ट फिल्म फेस्टीवल मध्ये ‘पाखरं ‘ या लघुपटाने पटकावला प्रथम क्रमांक

कोल्हापूर,आयडीयल आर्यन्स कल्चरल ग्रुप आणि शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित पहिला आय शॉर्ट फिल्म फेस्टीवल शुक्रवार दिनांक 28/07/2023 रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन इथे पार पडला.यात एकाच दिवशी 35 लघुपटाचे प्रदर्शन करण्यात आले… आयडीयल आर्यन्स ही संस्था गेली 18 वर्षे वेगवेगळे सांस्कृतिक उपक्रम राबवत असते.29 जुलै हा संस्थेचा वर्धापन दिन.या दिवशी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा आयडीयल पुरस्कार देवून सन्मान केला जातो.

यंदा हर्षल सुर्वे(गडकोट संवर्धन),राजूल लाइन्सवाला(विक्रमी रक्त),अरुण शिंदे(ज्येष्ठ स्पॉट दादा चित्रपट विभाग),दत्तात्रय पोवार(वृक्षप्रेमी),ऋषिकेश परीट(वृक्षप्रेमी)आणि अमोल बुड्डे(वृक्षप्रेमी) यांचा आयडीयल सन्मान करण्यात आला.

याच सोबत इम्तियाज बारगीर,मिलिंद अष्टेकर,सुनील मुसळे,किरण जेजूरकर आणि सुगून नाट्यसंस्था यांना मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

कोल्हापुरातून तयार होणाऱ्या आगामी चित्रपटाच्या टीमचा ही विशेष सन्मान करण्यात आला.त्यात सिनेमन(उमेश बगाडे),वहिवाट(संजय तोडकर), गाभ(अनुप जत्राटकर)आणि शिवायन (प्रशांत राजपूत,मकरंद लिंगनूरकर),धमाल मस्ती(अभिजित सोकांडे) या चित्रपटांचा समावेश आहे.

या संपूर्ण लघुपटाचे परीक्षण मयूर कुलकर्णी आणि अनुप जत्राटकर यांनी केले.या शॉर्ट फिल्म फेस्टीवल मध्ये पाखरं या लघुपटाचे प्रथम क्रमांक पटकावला.अधाशी द्वितीय तर डोमकावळा या लघुपटाने तृतीय क्रमांक मिळविला उत्तेजनार्थ अनुक्रमे संगर आणि वारीला सुट्टी नाही यांना मिळाला

वैयक्तीक अनुक्रमे दिग्दर्शन – सतीश धूतडमल(पाखरं) , लेखन – रंगा अडगळे (पाखरं) , कॅमेरामन – संजीव कुमार हिल्ली(नजरिया) , वेशभूषा – मेघा म्हात्रे(वारीला सुट्टी नाही) , रंगभूषा – सदानंद सूर्यवंशी(उतारा) , संगीत – प्रवीण अरवडे(अधाशी) , सर्वोत्कृष्ट अभिनेता – सुनील चौगुले(संगर) , सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – नेहा महाजन(इपरित) , सर्वोत्कृष्ट बाल कलाकार – टीम पाखरं

पारितोषिक वितरणाचे प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मीकांत खाबिया(संस्थापक अध्यक्ष शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान) आणि नितीन कुलकर्णी ज्येष्ठ अभिनेते,कवी हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन राधिका जोशी – कुलकर्णी यांनी केलं.कार्यक्रम यशस्वी करणेसाठी पॅडी गजगेश्र्वर,अनिरुद्ध कुलकर्णी,सुरेखा पाखरे,अजय खाडे,तेजस्विनी पळणीटकर,मकरंद लिंगनूरकर,संतोष पाखरे,आशुतोष रुकडे,भालचंद्र जोशी,चैत्राली राजुरिकर,प्राण चौगुले,वीरश्री पाटील,प्रसाद देशपांडे,भाग्यश्री कालेकर,प्रसाद तासे यांनी विशेष परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks