ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगुड येथील पूर्ण क्षमतेने भरलेल्या सरपिराजीराव घाटगे तलावाचे राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते पाणीपूजन

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मुरगूड ,यमगे व शिंदेवाडी या गावांना पाणी पुरवठा करणारा सरपिराजीराव तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.या तलावातील पाणी पूजन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले.सानिका स्पोर्ट्स मुरगूड यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी महापुरात वीज खंडित झाले असताना जिवाची पर्वा न करता पुराच्या पाण्यातून पोहत जावून मुरगुड मधील वीज कर्मचारी शहाजी खतकर सतीश रणवरे सागर गुजर भिकाजी चौगुले वैभव लोंढे यांनी वीज पुरवठा सुरळीत केल्याबद्दल त्यांचा सत्कार श्री.घाटगे यांच्या हस्ते करणेत आला.

यावेळी शाहू कृषी संघाचे अध्यक्ष अंनत फर्नांडिस ,विलास गुरव ,दत्तामामा खराडे,दगडु शेणवी ,बजरंग सोनुले ,दत्तामामा जाधव , विजय राजिगरे , सुशांत मांगोरे ,अमर चौगले , धोंडीराम माडेकर ,निवास कदम, राजू चव्हाण ,पिंटू भोई,प्रवीण चौगले, तलाव ऑफिस अधिकारी महादेव पाटील , कार्यकर्ते शाहू ग्रुप कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks