ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कागल तालुक्यातील अवचितवाडी उपराळा साठवण तलाव भरला

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुक्यातील अवचितवाडी येथील उपराळा साठवण तलाव (३१.८४ मी. उंची) सलग आठव्या वर्षीही पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून ओसंडून वाहत आहे. तलाव ओसंडल्याने पिण्याच्या पाण्याबरोबर ६०० एकर शेती ओलिताखाली येणार आहे. उपराळा तलाव भरल्याने अवचितवाडीत समाधानाचे वातावरण पसरले आहे. या तलावात ४९.८९ द.ल.घ.फू. इतका पाणीसाठा होतो, तर ८३ मी. लांबीचा सांडवा आहे.