स्वराज्य निर्माण च्या माध्यमातून चिखली जि.प.मतदारसंघात जि.प.शाळांना काम्प्यूटर व प्रिंटर संच भेट देणार – संदिप बोटे

मुरगूड प्रतिनिधी :विजय मोरबाळे
कागल तालुक्यातील शाळेतील विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानाचे धडे गिरविण्यातील अडचण दूर होण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांची संगणक शिकण्याची ईच्छा लक्षात घेवून महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशनच्या माध्यमातून स्वराज्य निर्माण चे संस्थापक संदिप बोटे यांच्या प्रयत्नातून चिखली जि.प.मध्ये मराठी शाळेला प्रत्येकी एक संगणक संच मिळवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
महा. एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन ऑफ इंडिया द्वारे राबविण्यात येत असलेला ‘एक हात मदतीचा’ सीएसआर सहभागावर आधारित एक अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी शासन आणि प्रशासनावर अवलंबून राहण्यापेक्षा सी.एस.आर कंपनी व लोकसहभागातून शक्य त्या गरजा पूर्ण करून शाळेतील विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. याच उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांची संगणकाची गरज सी.एस.आर.फंडाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहे.
सध्याचे युग माहिती तंत्रज्ञानाचे असून सर्वच ठिकाणी संगणकाचा उपयोग होत आहे. डिजिटल इंडियाच्या स्वप्नपूर्तीसाठी शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना संगणक हाताळण्याचे कौशल्य प्राप्त झाले पाहिजे.
डिजिटल इंडियाच्या स्वप्नपूर्तीसाठी आम्ही महा.एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशनने सीएसआर फंडच्या माध्यमातून खारीचा वाटा सामाजिक कामातून उचलत आहोत असे मत स्वराज्य निर्माण चे संस्थापक व महा.एनजीओ डेव्हलपमेंट अशोशिएशन चे संपर्कप्रमुख संदिप बोटे यांनी मांडले.