ताज्या बातम्यामहाराष्ट्र
महिलेसमोर अश्लील हावभाव करून तिला धमकी देणारा जयवंत कांबळेवर गुन्हा दाखल ; तात्काळ कारवाईने नेसरी पोलिसांचे कौतुक

नेसरी प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
नेसरी येथील जयवंत दुर्गापा कांबळे याने सार्वजनिक ठिकाणी एका महिलेसमोर अश्लील हावभाव करून तिला शिव्या देऊन त्यांना व त्यांचे पतीला ठार मारण्याची धमकी दिली होती सदर प्रकाराची नेसरी पोलिसांना माहिती मिळताच महिलेच्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन आरोपी जयवंत कांबळे यांचेवर गुन्हा दाखल केला
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार विलास पाटील यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने अवघ्या 24 तासात पूर्ण केला व आरोपी विरुद्ध प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गडहिंग्लज यांचे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले वेळीच दखल घेऊन केलेल्या कामगिरीबाबत पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी नेसरी पोलिसांचे कौतुक केले आहे.