ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापुरातून महायुतीच्याच उमेदवारांना लोकसभेत पाठवुया : राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांचे आवाहन ; कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने संसदेत पाठवूया. यासाठी प्रसंगी जीवाचे रान करुया, असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी केले.

कागलमध्ये पक्षसंघटना बांधणी संदर्भातील तालुकानिहाय आढावा बैठकीत ते बोलत होते.

पुढे बोलताना श्री. आसुर्लेकर- पाटील म्हणाले, कागल तालुक्यात बूथ कमिटीचे काम उल्लेखनीय आहे. पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी पन्हाळा गडावर छञपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचा केलेला संकल्प तडीस नेण्यासाठी प्रयत्न करूया. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या ज्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब होईल, तो उमेदवार मताधिक्याने संसदेत पाठवूया.

व्यासपीठावर गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, सौ. माधवी मोरबाळे, सौ. वर्षा बन्ने, प्रवीणसिंह भोसले, मनोजभाऊ फराकटे, रंगराव पाटील, चंद्रकांत गवळी, पैलवान रवींद्र पाटील, नवल बोते, नितीन दिंडे, विकास पाटील, सुभाष चौगुले, रमेश पाटील, प्रकाश पाटील, आप्पासाहेब भांदिगरे, दत्ता पाटील, डी. पी. पाटील, सौरभ पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, कार्याध्यक्ष अनिल साळुंखे, पंचायत समितीची माजी उपसभापती शशिकांत खोत, कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील- कुरुकलीकर यांची भाषणे झाली.

स्वागत व प्रास्ताविक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन दिंडे यांनी केले. सूत्रसंचालन विजय काळे यांनी केले. राजेंद्र पाटील यांनी आभार मानले.

जिल्हापरिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचा……….!

आगामी काळात होणा-या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली ३० ते ३५ जिल्हापरिषद सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आणूया. तसेच, जिल्हा परिषद अध्यक्षही आपल्याच पक्षाचा करुया. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पक्ष संघटनेची मजबूत बांधणी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी, असे आवाहनही श्री. आसुर्लेकर- पाटील यांनी केले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks