ताज्या बातम्यामहाराष्ट्र

केंचेवाडी येथील सेवानिवृत्त जवान भारत जाधव

चंदगड प्रतिनिधी/पुंडलिक सुतार

केंचेवाडी ता.चंदगड येथील सुपुत्र,जवान भारत बाबू जाधव हे  भारतीय सैन्यदलातून 17 वर्ष उल्लेखनीय सेवा बजावून ते 31 मे 2023 रोजी लान्स नायक पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यांचा अल्प परिचय थोडक्यात,श्री भारत जाधव हे सैन्यदलात मराठा एल.आय. रेजिमेंट सेंटर बेळगाव ला सोल्जर  जी. डी.या पदावर 23 मे 2006 साली भरती झाले व येथेच त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले यानंतर त्यांची प्रथम नियुक्ती आसाम येथे झाली यानंतर आर.आर. सेक्टर ,साऊथ सुडान (यु.एन. मिशन),डी.आर.डी.ओ.(दिल्ली),उत्तराखंड,केरळ आदी ठिकाणी त्यांनी जी.डी., लान्स नायक,आदि पदावरुन उल्लेखनीय अशी सेवा बजावून ते बेळगाव मराठा एल.आय.रेजिमेंट सेंटर येथुन सेवानिवृत्त झाले उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांचा सैन्यदलाच्यावतीने त्यांचा सत्कार झाला होता त्यांच्या जीवनप्रवासात वडील माजी सैनिक कै. बाबू जाधव यांचा आशीर्वाद लाभला तर आई श्रीमती शेवंता, पत्नी सौ.नितल, मुलगा कुणाल,श्रीरंग ,भाऊ माजी सैनिक श्री राजाराम व श्री दीपक  जाधव ,बहीण सौ.वैशाली नंदराज   नांदवडेकर यांचे मोलाचे योगदान लाभल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks