ताज्या बातम्यामहाराष्ट्र

खासबाग मैदानाची संरक्षक भिंत कोसळली ढिगाऱ्याखाली सापडून एक महिला ठार तर एक महिला गंभीर जखमी

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

केशवराव भोसले नाट्यगृह स्वच्छतागृहाला लागून असलेली खासबाग मैदानाची संरक्षक भिंत आज संध्याकाळच्या सुमारास कोसळली. या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दोन महिला सापडल्या होत्या. त्यांना बाहेर काढून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केलं. यामधील अश्विनी आनंदा यादव (वव 45, साई पार्क, भोसलेवाडी रोड, कसबा बावडा) या महिलेचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला आहे तर दुसरी महिला संध्या प्रशांत तेली (वव 30, रा. वडणगे, ता करवीर) ही गंभीर जखमी आहे.

कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं. सुमारे सव्वा तास हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होत. दरम्यान, आमदार ऋतुराज पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी करून रुग्णालयात जाऊन रुग्णांची केली विचारपूस

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks