मोठी बातमी! बुलढाणा येथे एसटीचा भीषण अपघात ; ५५ प्रवाशांसह बस घाटात उलटली

बुलढाणा परिसरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मलकापूर-बुलढाणा बसचा भीषण अपघात झाला आहे. बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. राजुरघाटात बसवरील नियंत्रण सुटल्याने बस उलटली. बसमध्ये 55 प्रवासी असल्याची माहिती आहे. प्रवाशांमध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या अपघातात दहा ते पंधरा प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.
अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांची स्थानिकांकडून सुटका करण्यात येत आहे. प्रवासी गाडीचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
बसचे ब्रेक फेल झाल्याने अपघात
मलकापूर-बुलढाणा बसमधील ५५ प्रवाशांची बस राजूर घाटात आल्यानंतर घाटात पलटी झाली आहे. बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले.