ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगूड : राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेत दोन हजार स्पर्धकांचा सहभाग

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

शाहू ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त मुरगूड केंद्रात भरवण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत 2000 विद्यार्थ्यांनी आपले भावविश्व कागदावर रेखाटले.

मुरगुड येथील मुरगुड विद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये या स्पर्धा उत्साहात पार पडल्या स्पर्धेचे उद्घाटन बिद्री कारखाना माजी व्हा.चेअरमन बाबासाहेब पाटील व शाहु कारखाना संचालक डॉ.डी.एस‌.पाटील यांच्या हस्ते झाले.तसेच शाहू महाराज पुतळा पूजन व स्व. राजेसाहेब यांच्या प्रतिमेचे आणि सरस्वतीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. स्वागत व प्रास्ताविक शाहू कारखान्याचे ऊस विकास अधिकारी डी.बी.जाधव यांनी केले.

याप्रसंगी बाबासाहेब पाटील म्हणाले, स्व. राजे विक्रमसिंह घाटगे हे नवकल्पकतेचे शिल्पकार होते. एखाद्या माणसातील सुप्त गूण शोधून त्याला प्रोत्साहन देत मोठं करण्याचे महत्वपूर्ण काम त्यांनी केले. शिवाय चांगले काम करण्याचा आदर्श राजेंनी निर्माण केला.

शाहू संचालक डॉ.डी.एस.पाटील म्हणाले,विक्रमसिंह राजेंनी उभ्या केलेल्या संस्था आणि त्या संस्थांच्या कामातील पारदर्शीपणा आजच्या तरुण पिढीने अभ्यासला पाहिजे. त्यांनी सहकारात असो अथवा राजकारणात आपली तत्त्व सोडले नाही.

यावेळी बोलताना बिद्री माजी संचालक दतामामा खराडे म्हणाले, शाहू कारखान्याच्या माध्यमातून स्व. विक्रमसिंह घाटगेंनी राज्याला सहकारात आदर्श देण्याचा प्रयत्न केला.

मुख्याध्यापक एस.आर.पाटील म्हणाले, स्व. राजे विक्रमसिंह घाटगे हे सहकार कृषी,कला क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात अभ्यासू व जाणते नेतृत्व होते.

मुलांमध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना वाव मिळावा. या उद्देशाने सुरू केलेल्या या चित्रकला स्पर्धेस वाढता प्रतिसाद मिळत आहे .या कार्यक्रमासाठी शाहु कृषी चेअरमन अनंत फर्नांडिस, भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष प्रताप पाटील, विलास गुरव, रामभाऊ खराडे, सुशांत मांगोरे, हिंदुराव रेपे, एम.के.पाटील, सुहास मोरे,समरजित खराडे, विलास गुरव, हिंदुराव किल्लेदार, अमर उर्फ छोटु चौगुले, आदी उपस्थीत होते.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी असिस्टंट सेक्रेटरी विष्णू जत्राटे, ऊस विकास अधिकारी डी.बी.जाधव, रॉबर्ट फर्नांडिस, सुधाकर जाधव, अरुण कांबळे, प्रमोद खराडे, विष्णू मोरबाळे, जयवंत पाटील, दत्ता जालीमसर, संभाजी गोधडे,निवृत्ती सावंत ,संग्राम साळोखे, अविनाश भराडे, उदय पाटील, चंद्रकांत आंगज, आप्पासाहेब रेपे यासह शाहू ग्रुप चे पदाधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन अनिल पाटील तर आभार माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांनी मानले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks