दगडू शेणवी यांचे कार्य कौतुकास्पद : राजे समरजितसिंह घाटगे ; सनिका स्पोर्ट्स फौंडेशनतर्फे शालेय साहित्य वाटप

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शालेय विद्यार्थ्यांसाठी ज्ञान ,शिक्षण महत्त्वाची बाजू आहे.विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दगडू शेणवी यांचे कार्य कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी केले. सहकार महर्षी विक्रमसिंह घाटगे यांच्या ७५ व्या जयंती निमित्त येथील सानिका स्पोर्ट्स फौंडेशन यांच्यावतीने ३०० विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, कागल विधानसभा मतदारसंघात काम करत राहणं, लोकांच्या सेवेत राहुन त्यांचे आशीर्वाद मिळवत राहणे, त्यासाठी आपल्या सगळ्यांचे सहकार्य मिळत राहू दे , रणजीतदादा मी काहीही वेगळा निर्णय घेत नाही. आपण पक्षातच राहणार आहोत. माझ्या राजकीय भावी वाटचालीबद्दल आपण जे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आपल्याला दहा हत्तीचे बळ मिळालं असल्याचे त्यांनी सांगितले.
स्व. विक्रमसिंह राजेंच्या ७५ व्या जयंतीनिमित्त ७५ हजार लाभार्थ्यांना शासन आपल्या दारी या योजनेतून लाभ मिळवून देणार आहोत. या उपक्रमातुन त्यांच्याशी थेट संवाद साधून त्यांचा आशीर्वाद मिळवून पुढे जायचे आहे.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संजय पाटील, बिद्री साखरचे माजी उपाध्यक्ष दत्तामामा खराडे, शाहु संचालक सुनिल मगदूम, बिद्री साखरचे माजी उपाध्यक्ष सुनिलराज सुर्यवंशी, भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष प्रताप पाटील, शाहु कृषी संघाचे चेअरमन अनंत फर्नाडिस, प्राचार्य एस. आर. पाटील, विलास गुरव, प्रवीण चौगले, विजय राजिगरे, सदाशिव गोधडे, उत्तम पाटील, पांडूरंग कुडवे, अमर चौगले, अमर रंगराव चौगले, सागर सापळे, गणेश तोडकर, निशांत जाधव,समरजित खराडे ,रतन जगताप ,सुनील कांबळे,राहुल खराडे, यांच्यासह विद्यार्थी, कार्यकर्ते उपस्थित होते.
सानिका स्पोर्ट्स चे अध्यक्ष सुशांत मांगोरे यांनी स्वागत केले. प्रास्ताविक सानिका स्पोर्ट्स चे संस्थापक दगडू शेणवी यांनी केले. सुत्रसंचालन मुरगूड विद्यालयाचे अध्यापक एम बी टिपुगडे यांनी केले. तर आभार राजू चव्हाण यांनी मानले.