ताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंदगड : म्हाळेवाडीच्या शिवानंद कांबळेची फॉरेन्सिक ऑफिसर परीक्षेत गगनभरारी

चंदगड प्रतिनिधी/पुंडलिक सुतार

म्हाळेवाडी ता.चंदगड चे सुपुत्र कु.शिवानंद रुक्माणा कांबळे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या असिस्टंट केमिकल अनालायझर (सहाय्यक रासायनिक विश्लेषक)फॉरेन्सिक ऑफिसर वर्ग-२ राजपत्रित या परीक्षेत गगनभरारी घेतली असून त्याच्या या यशाने संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्यानिमित्त त्यांचा अल्प परिचय थोडक्यात शिवानंद चे 10 वी पर्यंतचे शिक्षण गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील म्हाळेवाडी येथे झाले 12 वी विज्ञान एम आर कॉलेज गडहिंग्लज,B.Sc., राजाराम कॉलेज कोल्हापूर तर M.Sc(Industrial Chemistry),शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ला केली या परीक्षेत त्याने 71.13 टक्के ईतके गुण प्राप्त केले.

या नंतर त्याने AGIO फार्मा कंपनी पुणे येथे वर्षभर रिसर्च सायंटिस्ट म्हणून नोकरी केली 19 जानेवारी 2023 ला त्याने फॉरेन्सिक ऑफिसर या पदासाठी पुणे येथे परीक्षा दिली तर 11 जुलै 2023 रोजी त्याची मुलाखत CBD बेलापूर नवी मुंबई येथे मुलाखत झाली व 19 जुलै 2023 ला निकाल लागला या परीक्षेत त्याने 33 जणांच्या निवडीतून 25 वा क्रमांक प्राप्त केला तर SC प्रवर्गातुन राज्यात 2 रा क्रमांक प्राप्त केला.

अत्यंत नाजूक परिस्थिती,आई वडील शेती व मोलमजुरी करतात केवळ जिद्द व चिकाटीच्या जोरावर शिवानंद ने आभाळाला गवसणी घातली .त्याने संपूर्ण शिक्षण डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह गडहिंग्लज व कोल्हापूर येथे राहून पूर्ण केले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च व ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुणे मार्फत mpsc व upsc चे ऑनलाइन क्लासेस ही पूर्ण केले.

त्याला यासाठी शिवाजी विद्यापीठातील प्रा.के.एम.गरडकर,प्रा.डी. एम.पोरे,प्रा.अविराज कुलदीप,प्रा.राहुल माने यांचे मार्गदर्शन लाभले तर आई सौ.शोभा व वडील रुक्माणा यांचेही मोलाचे योगदान लाभले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks