ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम ; जिल्ह्यातील ७५ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात पडणाऱ्या संततधार पावसामुळे नद्यांची पातळी वाढतीय. आज संध्याकाळी ५ वाजता आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील ७५ बंधारे अजूनही पाण्याखाली गेले आहेत.

आज संध्याकाळी ५ वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी राजाराम बंधारा येथे ३६ फुट ५ इंचावर होती. सध्या राजाराम बंधाऱ्यातून ४०४५८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरुय. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फुट असून धोका पातळी ४३ फुट आहे.

राधानगरी धरणात ६.१३ टिएमसी पाणीसाठा असून राधानगरी धरणातून १३५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरुय.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ.

भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, व खडक कोगे.

कासारी नदीवरील- यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, वालोली, बाजारभोगाव व पेंडाखळे.

हिरण्यकेशी नदीवरील- साळगांव, सुळेरान, चांदेवाडी, दाभीळ, ऐनापूर व निलजी.

घटप्रभा नदीवरील- पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगांव, कानर्डे-सावर्डे, अडकूर, कानडेवाडी व तारेवाडी.

वेदगंगा नदीवरील- निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, सुरुपली, चिखली, गारगोटी, म्हसवे व शेणगांव.

कुंभी नदीवरील- कळे, शेनवडे, वेतवडे, मांडूकली, सांगशी व असळज

वारणा नदीवरील- चिंचोली, माणगांव, तांदूळवाडी व खोची

कडवी नदीवरील- भोसलेवाडी, कोपार्डे, शिरगांव, सवते सावर्डे व सरुड पाटणे.

धामणी नदीवरील- सुळे, पनोरे व आंबर्डे

तुळशी नदीवरील- बीड

ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, काकरे व न्हावेली

दुधगंगा नदीवरील –दत्तवाडी, सुळकुळ व सिध्दनेर्ली असे ७५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे.

राधानगरी ६.४३, तुळशी १.३७ टिएमसी, वारणा २२.७३ टिएमसी, दूधगंगा ९.८९ टिएमसी, कासारी २.०० टिएमसी, कडवी १.८२ टिएमसी, कुंभी १.९८ टिएमसी, पाटगाव २.२३ टिएमसी, चिकोत्रा ०.६४ टिएमसी, चित्री ०.८८ टिएमसी, जंगमहट्टी ०.६२ टिएमसी, घटप्रभा १.५६ टिएमसी, जांबरे ०.८२ टिएमसी , आंबेओहोळ ०.६३ टिएमसी, कोदे (ल.पा) ०.२१ टिएमसी असा आहे.

 बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे.

सुर्वे ३४.८ फूट, रुई ६४.८ फूट, इचलकरंजी ५९.६, तेरवाड ५१.६ फूट, शिरोळ ४३ फूट, नृसिंहवाडी ४१.६ फूट, राजापूर ३० फूट तर नजीकच्या जिल्ह्यातील सांगली ११.३ फूट व अंकली १६.६ फूट अशी आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks