ताज्या बातम्यामहाराष्ट्र
काळम्मावाडी धरणात 8.62 टीएमसी पाणीसाठा

गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या पावसाने जिल्ह्याला मोठा दिलासा मिलाला आहे. पिकांना जीवदान मिळाले आहेच, पण धरणांमध्येही पाण्याची वाढ वेगाने होत असल्याने चिंता काहीशी दूर झाली आहे. राधानगरीसह काळम्मावाडी धरणातही वेगाने साठा होत चालला आहे. दोन दिवसांपूर्वी धरणात केवळ 4.55 टीएमसी पाणीसाठा होता. तो आज सकाळपर्यंत 8.62 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पावसाने ओढ दिल्याने चिंता लागून राहिलेल्या शिरोळ, हातकणंगले तालुक्यामध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे.