ऊस बिला अभावी शेतकऱ्यांची शेती कामे ठप्प; साखर कारखानदारी बद्दल नाराजी. दोन महिने ऊस बीले मिळत नसल्याने शेतीचे अर्थचक्र विस्कटले.

सावरवाडी प्रतिनिधी :
साखर कारखान्याकडून फेबुवारी महिण्यात पुरवठा केलेल्या ऊसाची एफआरपी कायद्यानुसार दोन महिन्यापासुन ऊस बीले वेळेवर मिळत नाही . .ऊसबीले अभावी ग्रामीण भागात शेतीची कामे ठप्प होऊ लागली आहे .लॉक डाऊनच्या काळात ऊसबीले मिळत नसल्याने शेतीचे अर्थचक्र विस्कटले आहे .
यंदाचा ऊस गाळीत हंगाम नोव्हेंबर महिन्यात सुरु झाला .सरासरी १५ मार्च नंतर साखर कारखाण्यांचे गळीत हंगाम संपले .एकीकडे ऊस तोडणीसाठी ऊसतोडणी मजुरांनी शेतकऱ्यांना वेठीस धरून पैसे उकळले तर दुसरीकडे साखर कारखान्यांनी एफआरपीचे तुकडे केल्याने दोन दोन महिने ऊस बीले दिलेली नाहीत . याचा परिणाम दैनदिन जीवनावर होऊ लागला आहे .
सध्या लॉक डाऊनच्या काळात शेतकऱ्याच्या हाती पैसा नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे . ग्रामीण बाजारपेठेतही आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे . ऊसबीला अभावी शेतीमध्ये मशागतीची कामेही थंड़ावली आहे .
वाढत्या महागाईच्या काळात इंधन दरवाढीमुळे वाहनधारकानी शेती मशागतीचे दर वाढविले ट्रॅक्टर नांगरटी परवडत नाही .ऊसबीले मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बीकट होऊ लागली आहे . शेतीमध्ये नांगरटी करणे , शेणखत सोडणे , जमीन दुरुस्ती करणे . माती सोडणे ईत्यादी मशागतीची कामे थंडावली आहेत .
ऊस शेतीचा मशागत खर्च वाढला .
एकीकडे साखर कारखाण्यांची ऊस बीले वेळ वर मिळत नाहीत तर दुसरीकडे शेतीमशागत, भांगलण करणे, रासायनिक खतांची दरवाढ , पाणी पट्टीचे दर भडकले इंधन दरवाढीमुळे नांगरटी खर्च वाढला आहे . या साऱ्या पाश्र्वभुमीवर वाढत्या महागाईच्या काळात ऊस शेती परवडत नाही ः मशागतीच्या वाढत्या खर्चाचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे
( नामदेव पाटील – सचिव महाराष्ट्र राज्य किसान सभा कोल्हापूर जिल्हा )