ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मोठी बातमी : बॉम्बे नर्सिंग होम कायद्यानुसार हॉस्पिटलमध्ये दरपत्रक लावणे बंधनकारक ; नाहीतर होणार कारवाई !

बऱ्याच वेळा रुग्णांच्या नातेवाइकांकडून उपचाराचे अधिक बिल घेतल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. यावर प्रतिबंध म्हणून बॉम्बे नर्सिंग होम कायद्यानुसार प्रत्येक दरपत्रक लावण्याचे निर्देश आहेत.
कोणत्या प्रकारच्या तपासणीसाठी किती रुपये आकारले जातात, याची माहिती रुग्णांसह नातेवाइकांना व्हावी, या उद्देशाने सर्वच रुग्णालयांच्या दर्शनी भागावर दरपत्रक लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
बॉम्बे नर्सिंग होम कायद्यानुसार दरपत्रक लावणे बंधनकारक आहे. आतापर्यंत कोणत्याही रुग्णालयाविरोधात कारवाई झाली नाही ; मात्र रुग्णालयामध्ये दरपत्रक लावण्याबाबत लवकरच परिपत्रक निघणार आहे.