ताज्या बातम्यामहाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस कोल्हापूर शहरासह जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रमानी साजरा करूया ; कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा निर्धार

प्रतिनिधी : विजय मोरबाळे

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व व उत्तम प्रशासक आहेत, असे प्रतिपादन केडीसीसी बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर यांनी केले. कोल्हापूर शहरासह सबंध जिल्हाभर त्यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा करूया, असा निर्धार कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केला. उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या वाढदिवसाच्या नियोजनासाठी कोल्हापुरात आयोजित बैठकीला कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. श्री. आसुर्लेकर- पाटील बैठकीच्या अध्यक्ष स्थानी होते.

केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ माने म्हणाले, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे विकासाभिमुख नेतृत्व आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारपासून दि. २२ महिनाअखेर पर्यंत विविध सामाजिक उपक्रमांचा सप्ताह साजरा करणार आहोत. यामध्ये कोल्हापूर शहरासह सबंध जिल्हाभर तालुकानिहाय विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित केले जाणार आहेत.

पक्षाचे कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे म्हणाले, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्हाभर तालुकानिहाय विविध विधायक उपक्रम हाती घेतले जाणार आहेत.

राजेश लाटकर व आदिल फरास म्हणाले, कोल्हापूर शहरात रक्तदान शिबिरासह मिरजकर तिकटी येथील अंधशाळेच्या विद्यार्थ्यांना स्नेहभोजन, अनाथ आश्रमामध्ये तीन हजार किलो धान्य व तेलाचे डबे दिले जाणार आहेत.

तसेच सबंध जिल्हाभर तालुकानिहाय अनाथ आश्रमामध्ये जेवण, स्वातंत्र्य सैनिकांचे सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार, मूकबधिर व अनाथ वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन, अपंग विद्यार्थ्यांना पाचशे वह्यांचे वाटप, चंबुखडीच्या मातोश्री वृद्धाश्रमामध्ये फळे वाटप, रुग्णांना फळे वाटप, वृक्षारोपण, शालेय व शैक्षणिक साहित्याचे वाटप असे उपक्रम राबविले जाणार आहेत.

यावेळी केडीसीसी बँक संचालक बाबासाहेब पाटील – आसुर्लेकर, केडीसीसी बँक संचालक प्रताप ऊर्फ भैय्या माने, कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, महिला अध्यक्षा शितलताई फराकटे, माजी नगरसेवक आदिल फरास, माजी नगरसेवक राजेश लाटकर, युवराज पाटील, अमित गाताडे, गंगाधर व्हसकोटी, शहाजी जठार, वक्ता सेल अध्यक्ष रामराव बाळासो इंगळे, कागल तालुका सोशल मीडिया अध्यक्ष विजय सदाशिव काळे, माजी उपनगराध्यक्ष सतीश घाडगे, माजी नगरसेवक विनायक फाळके, पक्षप्रतोद नितीन दिंडे, सेवाविभाग प्रमुख बाळासाहेब देशमुख, अनिल कदम, प्रसाद उगवे, बाजार समिती संचालक सूर्यकांत पाटील, शिरिष देसाई, कोल्हापूर शहर युवक अध्यक्ष शांतीजित कदम, विक्रांत साळुंखे , करवीर तालुकाध्यक्ष मधुकर जांभळे, मुनीर शेख, शाहूवाडी तालुकाध्यक्ष संतोष धुमाळ, पन्हाळा तालुका युवक अध्यक्ष विश्वजीत साळुंखे, युवराज व्हरांबळे, बबन मुल्लाणी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला पदाधिकारी, कोल्हापूर शहर महिला अध्यक्षा सौ. जहिदा मुजावर, सुनिता राऊत, रईसा जमादार, कोल्हापूर शहर महिला उपाध्यक्षा सीमा भोसले, कोल्हापूर शहर युवती अध्यक्षा पुजा साळुंखे आदी प्रमुख उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks