मुरगुड : स्वाती शिंदेला ५३ किलो वजनगटात कास्यपदक

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड ता कागल येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय (साई) कुस्ती संकुल व जीएसडब्ल्यू जिंदाल ग्रुपची दत्तक कुस्तीगीर कुमारी स्वाती संजय शिंदे हिने गुजरात (गांधीनगर) येथे सुरु असलेल्या ३६ व्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत हिने ५३ किलो वजनगटात कास्यपदक पटकावले.
पात्रता फेरीत स्वातीने दिल्लीच्या प्रमिलास सुरुवातीच्या पंधरा सेकंदातच बगल डूब करुन भारंदाज या डावावर १०-०० अशा गुणफरकाने एकतर्फी विजय मिळवला.व
क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवला.
क्वार्टर फायनलची लढत मध्यप्रदेशच्या
पूजा जाट हिच्याबरोबर अटीतटीची झाली. खेमे थ्रो डावावर स्वातीने पूजाला चितपट करत शेवटच्या बारा सेकंदामध्ये विजय खेचून आणला आणि सेमी फायनल मध्ये प्रवेश केला.स्वातीची सेमी फायनलची कुस्ती आंतरराष्ट्रीय पदक विजेते ( डब्ल्यू एफ आय टीम)ची प्रियांशी हिच्याशी अटीतटीची व प्रेक्षणीय झाली.यात १२-०८ गुण फरकाने स्वातीला पराभवास सामोरे जावे लागले.
स्वातीची उत्तर प्रदेशच्या दिक्षा तोमर सोबत कास्यपदकाची अटीतटीची लढत झाली.यालढतीत ०१-०३ असे गुण असताना स्वातीने डबल नेल्सन हे टेक्निक वापरुन दीक्षा ला चितपट करत कास्यपदकाची कमाई केली.व महाराष्ट्राच्या महिला कुस्ती संघाला पदक मिळवून दिले.स्वातीला महाराष्ट्र कुस्ती संघाचे मार्गदर्शक दादासो लवटे,दत्ता माने,संदीप पठारे,मंगेश डोंगरे व माधुरी घराळ यांचे तसेच वस्ताद सुखदेव येरुडकर दयानंद खतकर,सागर देसाई यांचे मार्गदर्शन लाभले