ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कागल तालुक्यातील हळदवडे-दौलतवाडी दरम्यान जंगलात वाघाचा वावर ; नागरिकांत भीतीचे वातावरण

प्रतिनिधी : विजय मोरबाळे

दौलतवाडी- हळदवडे मार्गावरील डोंगराकडील भागातून हळदीकडच्या दिशेच्या झाडीतून वाघ जाताना रात्री ८.१५ वा. च्या सुमारास मुरगूड पोलिसांनी पाहिला. मुरगूड पोलिसांनी तत्काळ वन विभागाला सांगून हळदवडे, दौलतवाडी, करंजिवणे, हळदी गावात पोलीस पाटील यांच्या वतीने दवंडी देऊन सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. वाघ या परिसरातून गेल्याची वार्ता तीन – चार गावांत पसरल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

मुरगूड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन सरगर, कॉन्स्टेबल संदीप ढेकळे, चालक आनंदा भोईटे सेनापती कापशी येथील मोहरमसंदर्भातील बैठक संपवून मुरगूडला रात्री येत होते. रात्री ८.१५ वा.च्या सुमारास पोलीस गाड़ी हळदवडेवरून दौलतवाडीकडे येताना डोंगर उतारावरून वाघ हळदी गावाच्या जंगलातून निघून गेल्याचे मुरगूड पोलिसांनी पाहिले.

पोलीस निरीक्षक सरगर यांनी तत्काळ वन विभागाला कळवत हळदवडे, दौलतवाडी, करंजिवणे, हळदी गावात पोलीस पाटील यांच्याकरवी दवंडी देऊन सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.दरम्यान, कापशी वनपाल मारुती वागवेकर व वनरक्षक राहुल जोनवाल यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks