ताज्या बातम्यामहाराष्ट्र

7 हजार रुपयांची लाच घेताना महावितरण कंपनीचा कार्यकारी अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

राहते घराचे जवळ असलेला इलेक्ट्रिक पोल बदली करण्याकरिता व नवीन इलेक्ट्रिक पोल बसविण्यासाठी 7 हजार लाच स्वीकारणाऱ्या गोरेगाव विभागातील महावितरणचे कार्यकारी अभियंत्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. गणेश तुकाराम पाचपोहे (वय 55) असे लाच स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. रायगड लाच लुचपत पथकाने ही कारवाई केली आहे.

तक्रारदार यांचे गोरेगाव येथे घर आहे. घराच्या जवळ महावितरण विभागाचा इलेक्ट्रिक पोल आहे. हा पोल हलवून त्याठिकाणी नवीन पोल बसविण्यासाठी तक्रारदार यांनी अर्ज केला होता. याबाबत आरोपी गणेश पाचपोहे यांना मंगळवारी (दि.18 जुलै) भेटून माहिती दिली. आरोपी पाचपोहे यांनी तक्रारदार यांच्याकडे या कामासाठी सात हजाराची मागणी केली. तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी रायगड लाचलुचपत विभाग अलिबाग येथे येऊन तक्रार दाखल केली. तक्रारदार यांच्या तक्रारी नुसार लाच लुचपत पथकाने पडताळणी करून सापळा रचला. बुधवारी आरोपी गणेश पाचापोहे यांनी तक्रारदार यांच्याकडून सात हजार रुपये स्वीकारताना पथकाने रंगेहाथ पकडले.

ही कामगिरी पोलीस उप अधीक्षक शशिकांत पाडावे , पोलीस निरिक्षक रणजीत गलांडे , अरुण करकरे, विनोद जाधव, महेश पाटील, पोलीस हवालदार कौस्तुभ मगर, पोलीस हवालदार विवेक खंडागळे, पोलीस नाईक सचिन आटपाडकर यांच्या पथकाने केली.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks